ताण-तणावामध्ये शांत राहून समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढते. तसेच एकाग्रता सुद्धा वाढते तार्किक दृष्टिकोन वाढतो आणि आपल्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये स्पष्टता येते. विद्यार्थ्यांना बुद्धिबळातून स्पर्धात्मक जीवन व गणित विज्ञान यात खूप मदत होते. स्किझोफ्रेनिया या रोगावर उपचार होण्यास मदत होते. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. मेंदूचा व्यायाम होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. याप्रमाणेच संयम सुद्धा वाढतो. बुद्धिबळामुळे प्रतिस्पर्ध्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित होते. बुद्धिबळ खेळामुळे नियोजन कौशल्य सुधारते