भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी तर चौक्सीला कांस्यपदक आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात 18 व्या पदकाची भर पडली आहे. 50 मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपदक अशी एकूण 18 पदकं आली आहेत. भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. याच इव्हेंटमध्ये चीननं दुसऱ्या क्रमांकावर राहून रौप्यपदक आपल्या नावे केलं. तर भारताच्या आशी चौक्सीनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.