भालाफेकपटू नीरज जोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नीरज चोप्रा 88.88 मीटर भालेफेक करत सुवर्णवेध घेतला. नीरजने भालाफेकीत पहिल्या प्रयत्नात 82.38 मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 84.49 मीटर दूर थ्रो केला. चौथ्या प्रयत्नात नीरज याने 88.88 मीटर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात त्याने 80.80 मीटर थ्रो केला. नीरज चोप्रा सध्या सर्वोत्कृष्ट फॉर्म मध्ये असून पॅरिस ऑलिम्पिकवर त्याचे लक्ष आहे