चला तर मग जाणून घेऊया आपण हिवाळ्यात टोमॅटोचा वापर कसा करू शकतो.
टोमॅटोच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-सी असते जे त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेवरील बारीक रेषा कमी करण्यास देखील सक्षम असते.
तुम्ही टोमॅटोची साल काही काळ डोळ्यांखाली ठेवू शकता.
यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यास मदत होईल.
टोमॅटोचा वापर करून तुम्ही होममेड स्क्रब देखील बनवू शकता.
टोमॅटो आणि दह्याचा पॅकही लावू शकता. हे मिश्रण चांगले एकजिन करा आणि नंतर चेहऱ्यावर लावा.
ही पेस्ट सनबर्न झालेल्या भागावर लावल्याने उन्हामुळे झालेली जळजळ बरी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.