ऑक्सिडाईज चे दागिने झिप लाॅक प्लास्टिकच्या पाऊचमध्ये स्वतंत्रपणे ठेवा.
ऑक्सिडाईज दागिने नेहमी आद्रतेपासून दूर ठेवले पाहिजे जेणेकरून ते खराब होणार नाही.
ऑक्सिडाईज दागिने कोमट पाण्यातून बाहेर काढल्यावर मुलायम कपड्याने स्वच्छ करावे.
बेकिंग सोड्याने ऑक्सिडाईज दागिने 30 मिनिटे झाकून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
ऑक्सिडाईज दागिन्यांवर कोरडी टूथपेस्ट पावडर लावा आणि कोमट पाण्याने धुवा.
टोमॅटो आणि बेकिंग सोडा यांचा वापर करून ऑक्सिडाईज दागिने स्वच्छ करता येतात.
ऑक्सिडाईज दागिने जर ओलसर राहिले आणि तसेच कपाटात ठेवले गेले तर लवकरच ते काळे पडतात.
ऑक्सिडाईज ज्वेलरी घातल्यानंतर परफ्यूम मारताना काळजी घ्या कारण परफ्यूममधली रसायने या दागिन्यांसाठी हानिकारक असतात.
ऑक्सिडाईज दागिने कमीतकमी हाताळा.
दागिने खूप काळ मोकळ्या हवेत राहिले, तर त्यांच्यावरची चमक कमी हाेऊन ते काळे पडतात, त्यामुळे ते हवाबंद डब्यात ठेवा.