शक्यतो पुस्तक वाचातांना / हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.

खुणेसाठी पानं कोपर्‍यात दुमडण्याऐवजी पुस्तकखुणा (बुकमार्क्स) वापरावेत.

बकुळीचे सुकलेले गजरे, वेखंडाचे तुकडे पुस्तकांचे वाळवीपासून संरक्षण करतात.

बुकशेल्फमध्ये चंदनाची काडी, लवंग ठेवावेत.

दर तीन - चार महिन्यांनी पुस्तकांना ऊन दाखवावे.

पुस्तकांचे शेल्फ शक्यतो बंद काचेचे असावे, धूळ कमी बसते आणि पुस्तकं नीट दिसतात.

पुस्तकावर खुणा, चित्र रंगवणे, रेघा मारणे टाळावे त्यामुळे पुस्तकाचे सौंदर्य नष्ट होते.

पुस्तक पाणी सांडून ओले झाल्यास पंख्याखाली वाळवावे त्यानंतर पानांवरुन मध्यम गरम इस्त्री फिरवावी.

नवीन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टिक अथवा कागदी कव्हर घालावं.

१०

पुस्तके ठेवण्याआधी कपाटात फळीवर वर्तमानपत्र पसरावे.