प्रत्येक दोन-तीन वर्षांमध्ये ऑथराइज्ड सर्विस सेंटरमधून रिस्ट वॉच चेक करत राहा, यामुळे हे खराब होण्याअगोदर दुरुस्त करता येईल.

रिस्ट वॉच यूज केल्यानंतर रोज मुलायम कपड्याने स्वच्छ करा त्यामुळे वॉचवरील धूळ स्वच्छ होईल.

रिस्ट वॉच घातल्यानंतर परफ्यूम लावू नका, लेदर बँडला जास्त नुकसान पोहोचते.

रिस्ट वॉच काढून कोठेही ठेवू नका त्यामुळे स्क्रॅचेस येऊ शकतात ते ठेवण्यासाठी त्याच्या बॉक्सचा वापर करा.

रिस्ट वॉच सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, यामुळे वॉचचा रंग फेड होतो आणि बॅटरीचे आयुष्य कमी होते.

आपले रिस्ट वॉच कधीच मॅग्नेट जवळ ठेवू नका, यामुळे नुकसान पोहोचू शकते.

तुमच्या रिस्ट वॉचचा बँड जर लेदरचा असेल तर ते लेदर क्लीनरने आणि मेटलचा असेल तर ज्वेलरी क्लीनरने क्लीन करा.

रिस्ट वॉचच स्क्रिन क्लीनरने क्लीन करु शकता परंतु हे साफ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा.

वॉच कधी व्हायब्रेटिंग इलेक्ट्रिक अप्लायंस म्हणजेच रेफ्रिजरेटर, टीव्हीवर ठेवू नका, कारण यामुळे वॉचचे इंटरनल पार्ट्स डिस्टर्ब होऊ शकतात.

सैल पट्ट्याचे घड्याळ कधीही घालू नका, ते पडण्याची शक्यता असते.