भेंडी तुमचे वजन कमी करण्यात मदत करते तसेच तुमच्या त्वचेला तजेलदार बनवते.

भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असते जे गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

भेंडी मोतियाबिंदूपासून तसेच डोळ्यांची रोशनी नीट ठेवायला मदत करते.

भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे अँटिऑक्सिडंट्स भरपूर असते, ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते.

भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ आपल्या हाडांसाठी फारच उपयोगी असतो, यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.

भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी असून यात उपस्थित असलेला लसदार पदार्थ पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो.

भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते कारण ती लोह आणि हिमोग्लोबिन निर्माण करण्यास मदत करते.

भेंडी खाल्ल्यामुळे डायबिटीज होण्याचा धोका कमी असतो.

भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवते, कोलेस्टरॉल कमी करण्यास मदत करते.

खास करून 'कोलन कँसरला' दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते, ही आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास मदत करते.