उन्हाळ्याचे चटके लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्रास तर होतोच पण त्वचाही खराब होते.

कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. पण, यापासून तुम्ही आपलं संरक्षण करु शकता.

टॅनिंग, सनबर्न आणि अॅलर्जीसारख्या समस्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात या चुका करणं टाळलं पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात या 5 चुका करु नका.

1. दिवसातून एकदाच सनस्क्रीन लावणे : सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सनस्क्रीन चेहऱ्यावर लावावी.

2. मॉईश्चरायझिंग न करणे : तुमची त्वचा तेलकट आणि चेहऱ्यावर पिंपल्स असले तरीही तुम्ही मॉईश्चरायझर लावलेच पाहिजे. कारण ते त्वचेतील पाणी लॉक करते, त्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते.

3. भरपूर मेक-अप करणे : फाऊंडेशन, कन्सिलर आणि कॉन्टूर यांसारख्या जड मेकअपमुळे त्वचेतील पोर्स बंद होतात.

4. एक्सफोलिएटिंग न करणे : एक्सफोलिएशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी तयार होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे आवश्यक आहे, कारण ते पोर्स रोखू शकतात.

5. स्वत:ला हायड्रेट न ठेवणे : उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. हंगामी फळे खाऊन आणि दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिऊन तुम्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.