वाढत्या वायू प्रदुषणामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
प्रदूषके आपल्या श्वसनमार्गाद्वारे आपल्या शरीरात जात असल्यामुळे आपली वास घेण्याची क्षमता दिवसागणिक कमी होत आहे.
डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ही पाच आपली पाच ज्ञानेंद्रिये आहेत. यामुळे आपल्याचा पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव आणि वास घेणं याचं ज्ञान होतं आहे.
दिसणे किंवा ऐकणं याप्रमाणेच गंध म्हणजेच वास घेणे ही देखील एक महत्त्वाचं आहे. गंध न आल्याने आपल्या जीवनावर वेगळा परिणाम होऊ शकतो.
कोविड-19 आजाराच्या लक्षणांपैकी एक म्हणजे चव किंवा वास न येणे. श्वसन संसर्गाचाही या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियावर वाईट परिणाम होतो. यामध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचाही समावेश आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे वाढत्या वायू प्रदूषणामुळे आपली वास घेण्याची क्षमता कमकुवत होत आहे.
संशोधनानुसार सतत प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने ॲनोस्मिया (Anosmia) होण्याचा धोका 1.6 ते 1.7 पटीने वाढतो.
ॲनोस्मिया म्हणजे वास घेण्याची क्षमता (Loss of smell) कमी होणे.
डॉ. रामनाथन यांनी सांगितलं की, दीर्घकाळापासून ॲनोस्मियाच्या रुग्णांवर संशोधन करत आहेत.
ज्यामध्ये त्यांनी ॲनोस्मियाने ग्रस्त लोक उच्च पीएम 2.5 प्रदूषण असलेल्या भागात राहत होते का याचाही अभ्यास करण्यात आला आहे.
त्यांनी सांगितलं की, मेक्सिको शहरामधील लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची वास घेण्याची क्षमता कमी आहे.
म्हणजेच, शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना गंधाची जाणीव अधिक चांगली असते.