योग्य जीवनशैलीचा स्वीकार, धूम्रपान सोडणे, वजन नियंत्रित राखणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित करणे आपल्याला क्रॉनिक किडनी डिसीज दूर ठेवण्यास मदत करु शकते.
तुमचे मूत्रपिंड रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करुन ते तुमच्या लघवीवाटे बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
तुमचे हात आणि पाय सूजतात, उच्च रक्तदाब, अशक्तपणा, हृदयविकार, हाडे कमकुवत होणे आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका, प्रतिकारशक्ती कमी होणे, संक्रमण आणि गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होते.
मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, वय, हृदयविकार आणि मूत्रपिंडावर दुष्परिणाम करणारी औषधे घेणे हे मूत्रपिंडाच्या आजारास कारणीभूत ठरणारे काही घटक आहेत.
आज जागतिक मूत्रपिंड दिवस अर्थात किडनी डे आहे. या निमित्ताने जाणून घेऊया क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) टाळण्यासाठी उपाय कोणते?
तुमचा रक्तदाब तपासा : उच्च रक्तदाब तुमच्या मूत्रपिंडावर परिणाम करु शकतो आणि तुम्हाला किडनीच्या आजाराला बळी पडू शकतो.
नियमित तपासणी करा : जर तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर तुम्हाला नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे : तुम्हाला मधुमेह असल्यास, तुमच्या मूत्रपिंडाचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे.
धुम्रपान टाळा : धुम्रपान हे फुफ्फुसावरच नाही तर किडनीवरही दुष्परिणाम करते. धूम्रपानासारखी वाईट सवय सोडणे नक्कीच फायदेशीर ठरु शकते.
व्यायाम : नियमित व्यायाम केल्यासरक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास आणि किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत होते