सध्या देशात H3N2 विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



व्हायरल इन्फ्लूएंझा म्हणजेच H3N2 विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. देशातील व्हायरल फ्लूच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.



सर्दी, तापामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना H3N2 ची लागण झाल्यास त्यांना श्वसनात अडथळे येत आहेत.



वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना काळजी घेण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.



भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.



गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे.



सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.



H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणूचा वेगाने पसरत आहे. सर्दी, ताप आणि खोकला ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत



देशात व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.



या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे.



आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.