अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या आगामी गाण्याचा टीझर शेअर केला आहे. 'पुरी गल बात' असे या गाण्याचे नाव आहे. टीझरमध्ये टायगर श्रॉफ मौनी रॉयसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 'पुरी गल बात' गाण्याचा टीझर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. 'हिरोपंती 2' सिनेमात टायगर श्रॉफसह अभिनेत्री तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील दिसणार आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असतो. टायगर सध्या 'पुरी गल बात' मुळे चर्चेत आहे.