दिलखुलास हास्यासाठी प्रार्थना बेहेरे ओळखली जाते. प्रार्थनाने नुकतेच नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरांत पोहोचते आहे. सोशल मीडियावर प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाव्यतिरिक्त प्रार्थनाला पेंटिंग आणि स्केचेस करायला आवडतं. प्रार्थनाचा नुकताच 'अजिंक्य' सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रार्थनाने हिंदी टेलिव्हिजनद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'कॉफी आणि बरंच काही' या सिनेमातील प्रार्थनाची भूमिका प्रचंड गाजली.