करिअरच्या सुरुवातीच्या काळात शिल्पाची जास्त उंची तिच्या कामाच्या आड येत होती. स्वत: शिल्पानेच 'इंडियाज गॉट टॅलेंट' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये याबाबत सांगितले आहे. पूर्वीचे हिरो इतके उंच नव्हते. मला मिळालेल्या सर्व चित्रपटांमध्ये हिरो माझ्यापेक्षा लहान होते. जास्त उंची असल्यामुळे मला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळू शकले नाही. तिला जास्त उंचीमुळे अनेक कामे नाकारण्यात आल्याचं ती सांगते. शिल्पा 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या शिल्पाने अभिनयातून ब्रेक घेतला असून ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. 2021 मध्ये शिल्पा 'हंगामा 2' द्वारे अनेक वर्षांनी चित्रपटात परतली आहे.