थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य आहे की अयोग्य आहे? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं...



तज्ज्ञांच्या मते, थायरॉइड झालेल्या व्यक्तींनी सकाळी चहा पिणं टाळावं.



जर थायरॉइड झालेल्या व्यक्तींना सकाळी चहा पिण्याची इच्छा किंवा सवय असेल, तर तुम्ही औषध घेतल्याच्या 30 मिनिटांनंतर ग्रीन टी किंवा कोणतीही हर्बल टी पिऊ शकता.



औषध घेतल्यानंतर लगेच चहा पिणं हानिकारक आहे. असं केल्या औषधांचा परिणाम कमी होतो.



थायरॉइड झाल्यावर जर तुम्हाला चहा पिण्याची इच्छा असेल तर, तुम्ही हळदीचा चहा, तुळशीचा चहा किंवा दालचिनीचा चहाचं सेवन करु शकता.



शिवाय या हर्बल टी मुळे हार्मोनल समस्यांवरही नियंत्रण मिळवता येईल.