लेजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket) दुसऱ्या हंगामाला येत्या 20 सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे.



या लीगचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.



यावेळी चार संघात ही स्पर्धा रंगणार आहे.



या लीगमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत (S. Sreesanth), मिस्बाह उल हक आणि केविन ओ ब्रायननं यांनीही या हंगामात खेळण्याचं स्पष्ट केलंय.



टी-20 विश्वचषक 2017 मध्ये श्रीसंतनं घातक गोलंदाजी केली. या विश्वचषकात भेदक गोलंदाजी करत अनेक विरोधी संघाच्या फलंदाजाला माघारी घाडलं होतं.



श्रीसंत गेल्या 9 वर्षांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, लीजेंड्स लीग क्रिकेटमधून मैदानात पुन्हा मैदानात पुनरागमन करत आहे.



लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू एकसोबत खेळताना दिसणार आहे.



या लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा माजी खेळाडूंचं खेळ पाहायला मिळणार आहे.