बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सध्या डान्स दिवाने ज्युनियर्स या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



डान्स दिवाने ज्युनियर्स कार्यक्रमाच्या सेटवरील काही कॉमेडी व्हिडीओ नोरा सोशल मीडियावर शेअर करते.



नुकताच नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



व्हिडीओमध्ये नोरा 'मी प्रेग्नंट नाहीये...' असं म्हणताना दिसत आहे.



डान्स दिवाने ज्युनियर्स या कार्यक्रमाचे मर्सी, नीतू कपूर आणि टेरेंस लुईस हे परीक्षण करतात.



व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मर्सी, नीतू कपूर आणि टेरेंस लुईस हे गप्पा मारताना दिसत आहेत.



व्हिडीओमध्ये मर्सी म्हणतो, 'आम्ही तिघे प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल गप्पा मारत होतो. तर नोरा ही स्वत:ला पाहण्यात व्यस्त आहे.'



नोरा उत्तर देते, 'कारण मी प्रेग्नंट नाहीये.' यावर मर्सी म्हणते, 'हे लोकांना सांगितल्याबद्दल, धन्यवाद ' त्यानंतर सर्वजण हसतात.




व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नोका पिंक कलरची साडी, डीपनेक ब्लाऊज आणि पिंक कलरची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे.