घशात सूज असल्यास कोमट पाणी प्यावे.
मधामुळे घशाची खवखव आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो.
अॅपल सायडर व्हिनेगर घशातील संक्रमण आणि सर्दीवर रामबाण उपाय आहे.
घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा खा, त्यामुळे घशाला लवकर आराम मिळेल.
कच्चा लसूण घसा खवखवण्याच्या वेदना कमी करण्यास मदत करतो.
घशातील संसर्ग आणि सूज दूर करण्यासाठी मेथीचे दाणे पाण्यात उकळून प्यावे.
घशाला सूज आली असेल किंवा घसा दुखत असेल तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
घसा दुखत आणि खवखवत असेल तर रात्री हळदीचे दूध प्यावे.
लवंग, दालचिनी आणि आल्याचा चहा घशाच्या संसर्गावर प्रभावी काम करतो.
कांद्याचे पाणी उकळून प्यावे, त्यामुळे घशाच्या समस्या दूर होतात.