१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीश शासन भारतीयांच्या मनात राग उत्पन्न होईल असे कायदे घेऊन येत होते.

१८५७ नंतरच्या काळात काही स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर संघटना उभारल्या. पण भारतीयांच्या हितासाठी त्या संघटनांचा विशेष उपयोग झाला नाही.

राष्ट्रीय पातळीवर एक मोठी संघटना हवी होती, भाषा, प्रांत वेगळे वेगळे जरी असले तरी सर्व भारतीयांना ब्रिटीशांविरूद्ध एका छताखाली एकत्र आणता येईल.

यातुनच पुढे २८ डिसेंबर १८८५ ला निवृत्त नागरी सेवा अधिकारी ए.ओ.ह्युम यांनी कॉग्रेसची स्थापना केली.

कॉंग्रेसच्या स्थापनेत दादाभाई नौरोजी, दिनशा वाचा आणि इतर नेत्यांचाही समावेश होता.

कॉंग्रेसचे ध्येय राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी चळवळ उभारणे

स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना राष्ट्रीय मंच उपलब्ध करून देणे.

सर्वांना मान्य होईल असे राष्ट्रीय नेतृत्वाची निर्मिती करणे.

लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणे.