फळे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्यापासून शरीराला योग्य पोषण मिळत नाही.



फळांपासून पोषक तत्त्वे मिळविण्यासाठी, ते खाण्याच्या योग्य पद्धतीबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.



अनेकजण फळे सोलून खातात. खरंतर, सर्व फळांची साल खराब नसते. अशी काही फळे आहेत ज्यांच्या सालीमध्ये जास्तीत जास्त पौष्टिकता दडलेली असते.



या यादीत नाशपाती हे पहिले नाव आहे. कारण त्याच्या सालीमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट आढळतात.



पेरू हेही असेच एक फळ आहे. पेरूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांबरोबरच अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरही चांगल्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच ते सोलून खाऊ नये.



सफरचंद कधीही सोलून खाऊ नये. कारण त्यात जीवनसत्व, फायबर आणि अॅंटिऑक्सिडेंट्स असतात.



किवी खाण्याआधीही लोक अनेकदा ते सोलून काढतात. किवीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.