दूध उकळवताना जरा लक्ष इकडे तिकडे झालं की भांड्यातलं दूध कधी कधी उतू जातं.



पण जर वारंवार असं होत असेल तर दूध गरम करताना काही टीप्स लक्षात ठेवा.



म्हणजे दूध उतू न जाण्यास मदत होईल.



दूध उकळताना त्यावर झाकण ठेवावे.



अर्धवट झाकण ठेवल्यास दूध उतू न जाण्यास मदत होऊ शकते.



दूध गरम करताना योग्य भांड्याचा वापर करा.



त्यासाठी छोटं भांड वापरु नका.



दूध नेहमी मोठ्या भांड्यातच गरम करावे.



दूध नेहमी मंद आचेवर गरम करावे. त्यामुळे दूध हळू हळू उकळेल आणि उतू जाणार नाही.



दूध गरम करताना त्यामध्ये थोडे पाणी घालावे. त्यामुळे दूध भांड्याबाहेर येणार नाही.