अननस हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. अननस आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरु शकते. अननसामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते. अननस खाल्ल्यामुळे लवकर भूक नाही लागत. अननसामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अननस खाणे फायदेशीर ठरु शकते. हृदय निरोगी ठेवण्यास अननसामुळे मदत होऊ शकते. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. अननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. सर्दी, खोकल्याच्या त्रासाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.