आपण दररोज जेवणात कोणतीतरी भाजी खातो. भारतात सर्वात जास्त बटाट्याची भाजी खाल्ली जाते. बटाट्याशिवाय जेवणाची कल्पना देखील करता येऊ शकत नाही. जेव्हा कोणतीही भाजी बनवण्याचा विचार केला जातो तेव्हा बटाट्याचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटलं जातं. बटाट्यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच यामध्ये कॅल्शियम सारखे गुणधर्म देखील आढळतात. बटाट्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि डी देखील असतात. बटाट्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.