कामाच्या तासांवरुन सध्या एक नवा वाद निर्माण झाला आहे. नारायण मूर्तींच्या वक्तव्यानंतर कामाच्या तासांवरुन हा वाद आणखी बळावल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी आठवड्यात कामाचे तास हे 70 तास असावेत अशी मागणी केली आहे. त्यानंतर अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. त्यातच कोणत्या देशात कामाचे तास सगळ्यात कमी आहेत, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ऑस्ट्रियामध्ये दर आठवड्याला कामाचे तास हे 35.5 इतकेच आहेत. तर स्वित्झर्लंडमध्ये कामाचे तास हे आठवड्याला फक्त 34.6 इतकेच आहेत. नॉर्वेमध्ये काम करण्याचे आठवड्याचे तास हे 33.6 इतके आहेत. डेन्मार्कमध्ये एका हफ्त्यात लोक फक्त 32.5 तास काम करतात. तर नेदरलँडमध्ये लोक आठवड्याला फक्त 29.5 तासच काम करतात.