देशात कुत्री पाळणाऱ्यांची संख्या ही फार मोठी आहे. पण असेही बरेच लोक आहेत ज्यांना कुत्री अजिबात आवडत नाहीत. एका देशाच्या हुकुमशाहाला कुत्री अजिबात आवडत नव्हती. त्याने त्या देशातील राजधानीमध्ये कुत्र्यांवर बंदी घातली होती. हा देश म्हणजे आशिया खंडात असलेला तुर्कमेनिस्तान. सपरमुरत नियाजोवच्या सरकारने अनेक विचित्र नियम देशात लागू केले होते. माहितीनुसार, नियाजोवला कुत्री अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे 2003 मध्ये या देशाच्या राजधानीमध्ये कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या देशात चक्क कुत्र्यांवरच बंदी घालण्यात आली होती.