तुमची जर सतत चिडचिड होत असेल तर तुम्हाला मधुमेहाची तपासणी करुन घेण्याची आवश्यकता आहे. डोळ्यांनी तुम्हाला अस्पष्ट दिसणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. तुमची जखम भरण्यास वेळ लागत असेल तर तुम्हाला मधुमेहाची तपासणी करुन घेण्याची गरज असू शकते. त्वचेच्या रोगाची सतत लागण होणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. खूप तहान लागणे हे देखील मधुमेहाचेच एक लक्षण आहे. सतत लघुशंकेला जाणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. खूप भूक लागत असेल तरीही तुम्हाला मधुमेहाची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. वजन वाढणे किंवा कमी होणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. खूप थकवा जाणवणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे.