सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो



सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी धडपडत असतो.



फिट राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्ताही हेल्दी असावा



भारतात नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे, पोहे.



नाश्त्यासाठी आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ, वजन कमी करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो.



पोहे पचण्यास हलके असतात.



तसेच, पोह्यांमुळे सतत भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही



पोहे रक्तप्रवाहात ग्लूकोज संथ गतीने रिलीज करतं. ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही



एक वाटी पोह्यांमध्ये जवळपास 206 कॅलरी असतात.



पोह्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं.