झोपेमुळे व्यक्ती रिचार्ज होतो. यामुळे शरीराला आराम मिळतो त्यासोबतच थकवा आणि क्षीण दूर करण्यासाठीही मदत होते.



झोपेमुळे माणसाने खर्चे केलेली ऊर्जा भरून काढण्यास मदत होते. पण, एखादी व्यक्ती अनेक दिवस झोपली नाही तर काय होईल.



झोपेशिवाय मानवाचा मृत्यू होतो का याबाबत सविस्तर जाणून घ्या.



झोप ही मानवाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे.



तुम्ही चुकून एखादा दिवस जागरण केलं तर दुसऱ्या दिवशी तुमच्या दिनचर्येवर फरक दिसून येतो. जागरणामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवू लागतो.



तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की, एखादा माणूस झोपेशिवाय किती दिवस राहू शकतो आणि झोपेशिवाय माणसाचा मृत्यू होऊ शकतो का?



उत्तम आरोग्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याहून कमी झोपेमुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.



अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण ही ठरू शकते. यामुळे तुम्हाला ह्रदयविकार आणि ह्रदयासंबंधित इतर समस्या होण्याचा धोका असतो.



एका रिपोर्टनुसार, माणूस 11 दिवस जागरण करू शकतो. एखादा व्यक्ती 11 दिवस न झोपता राहिला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.



संशोधनानुसार, जर एखाद्या व्यक्तीने झोपणं टाळलं तर, त्याला सुरुवातीचे काही दिवस जास्त अडचणी येतात.



त्यानंतर शरीर कमकुवत होऊन अस्वस्थ वाटू लागतं. दहाव्या किंवा अकराव्या दिवशी माणसाचं मानसिक संतुलन बिघडलतं आणि बाराव्या दिवशी माणसाचा मृत्यू होईल.



इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, 1963 साली रँडी गार्डनर (Randy Gardner) या 17 वर्षीय तरुणावर हा प्रयोग करण्यात आला होता.



तो 11 दिवस 25 मिनिटे झोपेशिवाय राहिला. रँडी गार्डनरच्या नावावर सर्वाधिक दिवस जागं राहण्याचा विक्रम आहे. 11 दिवसानंतर त्याला झोप अनावर झाली.



या प्रयोगानंतर तो त्याच्या नियमित आयुष्यात परतला. यानंतर त्याच्या झोपेच्या सवयीमध्ये काही बदल दिसून आले.