बद्रिनाथ हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तसेच बद्रिनाथच्या आजूबाजूच्या परिसरात देखील बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत.

चरण पादुका

बद्रीनाथपासून 3 किमी अंतरावर आहे. हा एक डोंगराळ भाग आहे जिथे विष्णुंच्या पायाच्या खुणा पाहायला मिळतील.

ब्रह्मा कपाल

अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावरील एक पवित्र घाट आहे.

व्यास गुंफा

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये सरस्वती नदीच्या तिरावरील एक प्राचीन गुंफा आहे.

भीम पुल

सरस्वती नदी आणि अलकनंदा नदीचा संगम तुम्ही येथून पाहू शकता.

माणा गाव

हे सरस्वती नदीच्या काठावरील भारतातील शेवटचे गाव म्हटले.

पांडुकेश्वर मंदिर

6000 फूट उंचावर असलेले पांडुकेश्वरचे मंदिर एक पवित्र तीर्थस्थळ आहे.

विष्णुप्रयाग

अलकनंदा आणि धौलीगंगा नदीच्या संगमावर असलेले विष्णुप्रयाग हे देखील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

जोशीमठ

हे हिमालयातील ट्रेकिंसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.

तप्त कुंड

हे अग्निदेवताचे निवासस्थान आहे आणि औषधी गुणांसाठी हे प्रसिद्ध आहे.