वापरात असूनही नजरेतून हद्दपार झालेल्या 2 हजार रुपयांच्या नोटेला कायमचा पूर्णविराम देण्याचा निर्णय मोदी सरकारकडून आज जाहीर करण्यात आला. देशात 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीच्या भयकंर अनुभवामुळे या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. केजरीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 2000 ची नोट आणून भ्रष्टाचार थांबेल असे प्रथम सांगितले. आता ते म्हणत आहेत की 2000 ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधान शिक्षित असावेत. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो, त्याला समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या बदलून घेण्यास सांगितले आहे.