आशुतोष राणा: जेव्हा 'संघर्ष' या चित्रपटाचा उल्लेख होतो तेव्हा अक्षय कुमारच्या आधी आशुतोष राणाच्या उत्कृष्ट अभिनयाची आठवण येते.



'संघर्ष' या चित्रपटातील आशुतोष राणा यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



नवाजुद्दीन सिद्दीकी, 'बदलापूर' या चित्रपटातील नवाजुद्दीनची व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण केली. या चित्रपटामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली होती.



प्रशांत नारायण: प्रशांतने 'मर्डर-2' या चित्रपटात धीरज पांडे नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या व्यक्तिरेखेतील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.



'मर्दानी-2' या चित्रपटात विशाल जेठवाने खलनायकाची भूमिका साकारली. या चित्रपटात राणी मुखर्जीला आव्हान देणाऱ्या रेपिस्टची भूमिका विशालनं साकारली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं ‘कौन’ चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली.



अभिनेता रितेश देशमुखनं एक व्हिलन या चित्रपटात राकेश ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील रितेशच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



'टेबल-21' या चित्रपटात परेश रावल यांनी एका बापाची भूमिका साकारली आहे जो आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असतो.



चित्रपटातील परेश रावल यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप आश्चर्यचकित केले.



मकडी या चित्रपटात शबाना आझमी यांनी खलनायिकेची भूमिका साकारली. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.