अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये राशी डार्क ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये राशीचं कर्व्ही फिगर हायलाईट होत आहे. अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे. राशी खन्नाचा निरागस अंदाज आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. राशी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. राशीचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं. राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफीसर होण्याचं स्वप्न होतं. राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली. राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.