बिपाशा बसू सध्या चित्रपटांपासून दूर आहे. याचं कारण नुकतंच तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. बिपाशाच्या स्टाइलने सर्वांनाच वेड लावले आहे. या ब्युटी क्वीनची नेटवर्थ जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बिपाशा बसूने 2016 मध्ये टीव्ही मालिकेत आपली छाप पाडणाऱ्या करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. बिपाशा आणि करणची गणना खूप श्रीमंत जोडप्यांमध्ये केली जाते. बिपाशाने चित्रपटांच्या दुनियेत खूप नाव कमावले आहे पण तिची एकूण संपत्ती तुम्हाला माहित आहे का? बिपाशा बसू मुख्यतः तिच्या चित्रपट आणि जाहिरातींमधून मोठी कमाई करते. बिपाशा तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी कोटी रुपये मानधन घेते. बिपाशा बसूची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 113 कोटी रुपये आहे. यासोबतच बिपाशा बसूचे मुंबईतील वांद्रे येथे 16 कोटींचे अलिशान घर आहे. बिपाशाकडे ऑडी क्यू, 25 लाख किमतीच्या फोक्सवॅगन बीटल आणि 28 लाख किमतीच्या टोयोटा फॉर्च्युनर सारख्या आलिशान कार आहेत. बिपाशा बसू लवकरच चित्रपटांकडे वळेल अशी तिची चाहत्यांना आशा आहे.