तूप आरोग्य उत्तम राखण्यासोबतच तुमची त्वचा सुंदर बनवण्यासाठीही उपयोगी आहे. तुम्ही थेट त्वचेवर तूप लावू शकता आणि याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. तसेच तूपाचा वापर करुन तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकता. तूप खाल्लाने तुमचे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल. तूप त्वेचेला दिर्घकाळ हायड्रेशन देण्यास मदत करते. त्यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येपासून तुमची सुटका होण्यास मदत होते. तुपामध्ये मॉइश्चरायझिंगचा देखील गुणधर्म असतो. त्यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर कऱण्यास देखील तूप फायदेशीर ठरु शकते. तुपातील काही गुणधर्म असतात त्वचेची लवचिकता सुधारतात, यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते. तुपामध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमची पचनक्रिया देखील चांगला राहण्यास मदत होते.