मान्सून सुरु झाला असून रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. पण, पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याची अधिक गरज असते.



पावसाळ्यात आल्हाददायक वातावरण पाहायला मिळते. सर्वत्र हिरवळ पाहून मन प्रसन्न होतं.



पावसाळ्यात उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी, या काळात वेगवेगळे आजार डोकं वर काढतात.



मान्सूनमध्ये आजारांचा धोका वाढतो. यावेळी निष्काळजीपणा केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल.



पावसाळ्यात भाज्या आणि फळांमध्ये किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात भाज्या आणि फळे खाताना योग्य काळजी घ्या.



पावसाळ्याच्या पालक, मेथी, पालेभाज्या यासारख्या हिरव्या भाज्यांपासून दूर राहावे. कारण यामध्ये छोटे हिरवे किडे आढळतात. हे कीटक कधीकधी पानांच्या रंगाचे असतात, जे दिसत नाहीत.



मान्सूनमध्ये हिरव्या पालेभाज्यांसह कोबी आणि फ्लॉवर खाणं देखील टाळावे. कारण पावसाळ्यात त्यामध्ये कीटकही आढळतात.



पावसाळ्यात मशरूम खाणंही टाळावं. कारण, यामुळे यावेळी मशरुम खाल्ल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो, ज्यामुळे उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.



पावसाळ्यात शिमला मिरची म्हणजेच भोपळी मिरचीही खाऊ नये. यामध्ये किडे असण्याची शक्यता असते.



पावसाळ्यात आरोग्याची नीट काळजी घ्या. भाज्या आणि फळे नीट आणि काळजीपूर्वक खा.



योग्य काळजी घेऊन आजारी पडण्यापासून स्वत:ला वाचवा.