रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. लिंबू पाण्यात तुम्ही पुदिना देखील घालू शकता. लिंबू आणि पुदिन्यामधील पोषण तत्वामुळे तुमच्या आरोग्यास अनेक फायदे मिळू शकतात. उष्णतेच्या दिवसांत लिंबू पाणी तुमच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरु शकते. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत होऊ शकते. अॅसिडीटीपासून देखील तुम्हाला सुटका होण्यास मदत होईल. यामधून तुम्हाला जीवनसत्त्व 'क' आणि 'अ' मिळण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरु शकते. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्यास देखील तुम्हाला मदत होईल. उष्णतेच्या दिवसामध्ये तुमच्या पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरु शकते.