सुंदर, गुलाबी आणि नरम ओठ कोणाला नको असतात, परंतु बदलत्या वातावरणाचा शरीराच्या अवयवांवर, त्वचेवर परिणाम होतो, तसाच ओठांवरही होतो

उन्हाळ्यातही तुमच्या ओठांचं सौंदर्य कमी होत असेल तर असे काही उपाय आहेत, जे तुम्ही आपल्या ब्युटी रुटीनमध्ये सामील केले तर तुमचे ओठ हे गुलाबी आणि मुलायम राहू शकतात.

उन्हाळ्यात ड्राय लिप्सची समस्या उद्भवू शकते. कधी कधी तर ओठांना भेगा देखील पडतात. यासाठी हळद आणि दुधाची पेस्ट करुन ती ओठांवर लावल्यास फरक दिसू शकतो.

गुलाबी आणि नरम ओठ हवे असतील तर लिंबू आणि मध दोन्ही गोष्टी एकत्र करुन ओठांवर लावा आणि काही वेळाने ओल्या कपड्याने ओठ स्वच्छ पुसून घ्या.

फाटलेल्या ओठांसाठी खोबरेल तेल देखील खूप फायदेशीर ठरु शकते. खोबरेल तेलाच्या काही थेंबांनी ओठांना मसाज करा. यामुळे ओठ नरम आणि मऊ होतील.

कोरफड जेलमध्ये चिमूटभर दालचिनी मिसळा आणि ही पेस्ट ओठांवर लावा आणि तशीच राहू द्या. यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील.

तुम्ही ओठांवर शिया बटर देखील लावू शकता. यामुळे ओठांना आर्द्रता मिळते. त्याच्या नियमित वापराने ओठांची त्वचा निरोगी होण्यास मदत होते.

डाळिंबाचे दाणे काढा आणि ठेचून सायीसह पेस्ट तयार करा आणि ओठांवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. थोड्या वेळाने कोमट पाण्याने स्वच्छ करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.