भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान अर्थात पीएसएलव्ही हे 1990 साली विकसित केले आहे. त्यानंतर 1993 साली इस्रोचा पीएलएलव्हीच्या मदतीने पहिला उपग्रह हा अवकाशात झेपावला.
22 ऑक्टोबर 2008 साली भारताच्या चांद्रयाने अंतराळात भरारी घेतली आणि नोव्हेंबर 8 रोजी भारताचा तिरंगा चंद्रवर चितारण्यात आला.
या यानामुळे एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी मदत होते. या यानामधून केवळ एकच उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करता येतो.
जानेवारी 2014 मध्ये जीएसएलव्ही मार्क - 2 हे संपूर्ण भारतीय बनावटीचे इंजिन तयार करण्यात आले.
अंतराळात झेप घेतल्यानंतर 24 सप्टेंबर 2014 रोजी या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता.
भारताने आपला सातवा नौवाहन उपग्रह 28 एप्रिल 2016 रोजी अंतराळात प्रक्षेपित केला होता.
15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 104 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं होतं.
अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटरवर जाऊन थांबली होती.
LVM3-M3 मोहिमेचा भाग असलेल्या 36 OneWeb उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित केले होते.