दिल्ली पासून लाहोरपर्यंत ही रेल्वे आठवड्यातून दोनदा धावते या रेल्वेचे नाव 'समझौता एक्सप्रेस' असं आहे. समझौता एक्सप्रेस पहिल्यांदा शिमला समाझौता करारानंतर चालवण्यात आली होती. या रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांकडे पासपोर्ट आणि वीजा असणे आवश्यक आहे. तसेच अनेक कागदपत्रांची औपचारिकता करावी लागते. या रेल्वेचे प्रवास भाडे हे विमानाच्या तिकीटापेक्षा कमी असते. ही रेल्वे दिल्ली स्थानकावरुन रात्री 11.10 मिनिटांनी सुटते. त्यासाठी दिल्ली स्थानकावर वेगळा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. दिल्लीनंतर ही रेल्वे अटारी स्थानकावर थांबते. दोन्ही देशाच्या सरकारकडून अनेकदा ही रेल्वे बंद करण्यात आली आहे.