दिल्लीच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. आजपासून सुरु झालेल्या कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते बंद करण्यात आले असून काही मार्ग वळवण्यात आले आहेत मात्र तरीही दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र समजला जातो. श्रावण महिन्याला सुरुवात होताच कावड यात्रा देखील सुरु होते. श्रावण महिन्यात महादेवाची विधीवत पूजा करण्यासोबतच अनेक जण पायी कावड यात्रेला निघतात आणि गंगा नदीचं पवित्र पाणी कावडमध्ये भरुन घेऊन जातात. यंदा 15 ते 20 लाख भाविक कावड यात्रेसाठी दिल्लीत येण्याची शक्यता आहे. येत्या चतुर्दशीला म्हणजेच 15 जुलै रोजी समारोप होणार आहे.