केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीबाबत मोठा दिलासादायक दावा केला आहे.
देशात पेट्रोलची किंमत 15 रुपये प्रतिलीटर होऊ शकते, असा दावा गडकरी यांनी केला आहे.
राजस्थानमधील (Rajasthan) एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना त्यांनी हा मोठा दावा केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा इंधनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
राजस्थानमधील महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीज वापरल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 15 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरता येऊ शकतो.
नितीन गडकरी यांनी राजस्थानमधील प्रतापगढ येथे 5600 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केलं.
गडकरी म्हणाले की, सरासरी 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीजेचा वापर केल्यास पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल.
भारतात इंधनाची आयात 16 लाख कोटी रुपयांची आहे. ही आयात कमी केल्यास हा पैसा परदेशात जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी पोहोचेल.
उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. त्यामुळे असं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं आहे की, 'शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाताही बनेल.