साप हा अत्यंत विषारी प्राणी आहे. साप जर चावला तर कदाचित माणासाचा जीव देखील जाऊ शकतो. पण जगात असा एक देश आहे, जिथे एकही साप नाही. आयर्लंडमध्ये एकही साप आढळून येत नाही. आयर्लंडमध्ये साप नाही .याची एक पौराणिक कथा देखील आहे. असं म्हटलं जातं की, पॅट्रीक नावाचे एक संत होते. ज्यांनी देशातील सर्व सापांना एकत्र गोळा केलं होतं. त्यानंतर त्यांनी त्या सापांना आयर्लंडमधून समुद्रात फेकलं होतं हे काम त्यांनी 40 दिवस उपाशी राहून केलं होतं. तर वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या देशात साप कधी नव्हतेच.