छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
ती वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आहे
पण दुसरीकडे काही लोक,ज्यांना विरोध, द्वेष, मत्सर सरकारच्या प्रत्येक कामावर व्यक्त करतात.
वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून,अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला
भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे.
पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल.
सांस्कृतिक कार्य विभाग काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू., मुख्यमंत्री म्हणाले