'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'द केरळ स्टोरी' 3 ते 5 कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदीप्तो सेनने 'द केरळ स्टोरी'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मुस्लिम समाज 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या कथानकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हटलं जात आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक खूपच भावनिक आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची बांधणी खूपच चांगल्याप्रकारे करण्यात आली आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.