बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात स्पॉट झाली. जान्हवीने 'फिल्मफेअर पुरस्कार' सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर जान्हवी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. जान्हवीचा 'बवाल' आणि 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून जान्हवीने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. जान्हवीने आजवर रुही, गुंजन सक्सेना, गुड लक जेरी सारख्या सिनेमांत काम केलं आहे. जान्हवी कपूरने 'एनटीआर 30' या सिनेमासाठी चार कोटी मानधन घेतलं आहे. जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. जान्हवीची 'राणा नायडू' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.