अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते नुकतेच तिने एक फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटवर प्राजक्ताच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत. प्राजक्ताने हिरव्या रंगाची पैठणी नेसली आहे. आपला ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तिने पारंपरीक ज्वेलरी कॅरी केली आहे. कानात कुडी, गळ्यात बोरमाळ, नाकात नथ हे दागिने तिने परिधान केले आहे. अंबाड्यांवर गजरा, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि खाद्यावरील पदराने ती आणखीच सुंदर दिसते प्राजक्ताच्या या मराठमोळ्या लूकवर चाहते भाळले आहेत स्वर्गातील अप्सरा का काय म्हणतात ती तूच असावी असे एका चाहत्याने म्हटले