'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 0.3 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या सहा दिवसांत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहीर साबळे यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदेने 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचं राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत. शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची निर्मिती करण्याचा घाट केदार शिंदेंनी घातला आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 1.03 कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीतच 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. अजय-अतुल यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.