'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं जेएनयूमध्ये आज खास स्क्रीनिंग होणार आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 5 मे 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमावर टीका होत आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा केरळमधील 32000 बेपत्ता मुलींवर आधारित आहे. केरळमधील 32000 मुलींचं धर्मांतर करुन त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास कसं भाग पाडलं जातं हे 'द केरळ स्टोरी' या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सुदीप्तो सेन यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. केरळमध्ये तरुण मुलींची कशी फसवणूक होते, त्यांचं ब्रेनवॉश कसं केलं जातं, हे 'द केरळ स्टोरी' या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.