सब्जामध्ये पोषकतत्वांचं प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी उत्तम ठरतं. पिताचा त्रास असणाऱ्यांनी सब्जाचा समावेश आहारात करावा. उष्णतेच्या अनेक विकारांवर सब्जा परिणामकारक ठरतो. लघवीच्या जागी जळजळ होत असेल तर दिवसातून २ - ३ वेळा एक चमचा भिजवलेला सब्जा खाल्ल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल. मानसिक आजारांवर सब्जा उपयुक्त ठरतो. डिप्रेशन, ताण, चिडचिड होत असेल तर आहारात सब्जाचा समावेश करा. डोक्याच्या आजारावर जसे की डोकेदुखी, मायग्रेन यांवर सब्जा फायदेशीर आहे. निद्रानाशाचा त्रास सब्जामुळे कमी होतो. मधुमेह, हृदयविकार,डोळ्यांचे विकार, स्नायूंचे विकार यावर सब्जा परिणामकारक ठरतो. लठ्ठपणावर आणि केसांच्या विकारांवर सब्जा फायदेशीर ठरतो.